loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला नगरसेवकांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा सन्मान सोमवारी सायंकाळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या वर्षा ढेकणे आणि नितीन जाधव तसेच नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, नगरसेवक राजेश तोडणकर, नगरसेवक समीर तिवरेकर यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन केला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप रसाळ, सचिन करमरकर आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी ॲड. दीपक पटवर्धन यांनी सर्व नगरसेवक, नगरसेविकांचे अभिनंदन करून चांगल्या मताधिक्याने यश मिळवल्याबद्दल कौतुक केले. प्रभागाच्या विकासासाठी काम करावेत. चांगल्या योजना प्रभागासाठी आणाव्यात, प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. रस्ते विकास, गटार बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावेत. रत्नागिरी नगर परिषदेत चुणूक दाखवावी, अशी सूचनाही ॲड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg