loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. जाधव नर्सिंग होम, रोहा येथे स्तन (मॅमोग्राफी) पडताळणी व निदान आरोग्य शिबिराला उर्त्स्फुत प्रतिसाद

रोहा (दीप वायडेकर) - रोहा मेडिकल असोसिएशन आणि एम | ओ | सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्तन (मॅमोग्राफी) पडताळणी व निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ जाधव नर्सिंग होम रोहा येथे आयोजित शिबिराला रोहेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी डॉ. देवेंद्र पाल एमडी, डीएनबी, इसीएमओ कर्करोगतज्ञ, डॉ. अशोक जाधव कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट फिजिशियन, डॉ. सर्जील कर्जिकर बी.ए.एम.एस, डॉ संदेश शिंदे बी.ए.एम.एस, डॉ.अनामिका लोहार बी ए एम एस, यांसह अन्य डॉक्टर नर्स व डॉ जाधव नर्सिंग होम मधील कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, यावेळी डॉ. अशोक म्हणाले की, या आरोग्य शिबिरात मॅमोग्राफीसाठी प्रथम ४० वर्षांवरील ३० महिलांना प्राधान्य दिले जाते. शिबिर तपासणी साठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे, वर्षातून दोन वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येते. महिलांनी ४० वर्षानंतर वेळोवेळी आपली तपासणी करून घ्यावी, जेणे करुन लवकर निदान होऊन पुढील त्रासापासून मुक्तता होईल. हे शिबिर सुरक्षित व स्वच्छ वातावरणात घेण्यात आले.

टाइम्स स्पेशल

ह्या शिबिरात स्त्री कर्करोग तज्ञांद्वारे तपासणी करण्यात येते विशेष म्हणजे वैद्यकीय अहवालाची गोपनीयता ठेवली जाते. तज्ञ डॉक्टर विनामूल्य मार्गदर्शन करतात. शिबिरात कोणतीही फी आकारली जात नाही. आपले ० ते १०० वर्षा पर्यंतचे आयुष्य आहे, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने सकाळी लवकर उठून योगासन, चालणे, व्यायाम करणे गरजेचे आहे, उत्तम आहार केल्यास आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो, असेही डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg