loader
Breaking News
Breaking News
Foto

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवास येथे भव्य रांगोळी प्रदर्शन

खारेपाट (महेंद्र म्हात्रे) - बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवास येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे शुभारंभ आवास ग्रामपंचायत सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कला संस्कृती यांचे जतन केले जाते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहासिनी राणे, अवंती राणे, विनया घरत, आवास गावच्या पोलीस पाटील श्रेया म्हात्रे प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल दारकुंडे शिक्षकेतर प्रतिनिधी गणेश राणे व स्नेहसंमेलन अध्यक्ष अजित नाईक धनराज फड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रस्ताविक धनंजय भगत यांनी केले. यावेळी रांगोळी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी पल्लवी पाटील दिव्या भगत प्रीती कवळे शतदा राऊत यांनी चांगले नियोजन केले. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्र, स्वच्छ भारत, भारतीय सण व संस्कृती अशा विविध विषय असून रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. स म वडके विद्यालय चोंडी केदार पाटील यांनी परीक्षण केले. इयत्ता अकरावी बारावी गट प्रथम क्रमांक सृष्टी वाघमारे, इयत्ता नववी दहावी गट प्रथम क्रमांक शमिका म्हात्रे, उत्तेजनार्थ इयत्ता सातवी आठवी गट व इयत्ता पाचवी सहावी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव सरपंच अभिलाषा राणे व आवास सासवणे धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत राणे संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांनी कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg