loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर पोलीस ठाण्याच्यावतीने जेष्ठ नागरिकांची सभा आयोजीत करणेत आली होती. त्यावेळी संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी जेष्ठनागरिकांना विशेष मार्गदर्शन केले. पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव आहेत असे आश्वासित केले. यावेळी ज्या जेष्ठ नागरिकांचा जन्म दिवस होता त्यांना मिशन प्रतिसाद अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांना आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि समाधानाने परिपूर्ण असो, आपल्या चेहर्‍यावरचं हास्य असंच खुलत राहो, आणि आपला आशीर्वाद नेहमी आम्हाला लाभत राहो हीच मनःपूर्वक शुभेच्छा!!असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची स्वाक्षरी असलेले प्रमाण पत्र देऊन सन्मानित करणेत आले. याच वेळी मिशन प्रतिसाद रत्नागिरी पोलीस दलातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी मिशन प्रतिसाद सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक: ८३९०९ २९१०० असुन जेष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करणेत आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित जेष्ठ नागरिकांनी या मिशनचे कौतुक करून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे विशेष आभार मानले. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने पोलीस व नागरिकांना अधिक जवळ आणणारी आधुनिक डिजिटल जोड! आपत्कालीन परिस्थितीत तक्रार नोंदणी, महिला सहायता, गोपनीय सूचना, तक्रारीची स्थिती, उद्योग, व्यापार सहायता, सागरी सुरक्षा सहायता, सामान्य माहिती, मदतीसाठी बाजूचा कोड स्कॅन करा, ९३७१-४१५६१२ वर हाय मेसेज पाठवा. नितीन बगाटे यांनी (भा. पो. से.).आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

वरील माहिती देताना संगमेश्वरचे पो. नि. चव्हाण यांनी पोलीस आपल्या सेवेसाठी २४ तास आहेत असे सांगितल्याने जेष्ठ नागरिकांच्या मनात वेगळे आदराचे स्थान निर्माण केले. या वेळी जेष्ठ नागरिक संघ संगमेश्वरचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये, उपाध्यक्ष उदय संसारे, प्रभाकर वाडकर, भिकाजी साळवी अंगराज कोळवंणकर, अविनाश चोचे आदी, बरोबर संगमेश्वर, कसबा फणसवणे येथील जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg