loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी हीच माझी संपत्ती - श्रीमती कळमकर

साटेली (प्रतिनिधी) - स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत रहा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आणि धैर्यासाठी कठोर परिश्रम करा. जो शिकत राहतो तोच मोठा होतो. तुम्ही विद्यार्थी मोठे झालात, तर हेच माझ्यासाठी मोठे आहे. यापेक्षा काही मोठे नाही. विद्यार्थी हीच माझी संपत्ती आहे असे उदगार अध्यक्षीय भाषणावेळी कळमकर यांनी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले. 33 वर्षानंतर न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे आयोजित इयत्ता दहावी 1991-92 चा स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर गुरुवर्य फातर्फेकर, श्रीमती देऊळकर, शिक्षक आर. एन. गवस, गोवेकर, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्रीमती कळमकर पुढे म्हणाले आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा आहे. आपल्यात आत्मविश्वास, कठोर परिश्रम, सकारात्मकता आणि धैर्य गाठण्याची जिद्द यावर भर द्या. ह्या गोष्टी तुमच्या मुलांच्या मनामध्ये रुजवा तरच आपली मुले आपल्या आयुष्यात मोठी होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती फातर्फेकर म्हणाल्यात आपल्या मुलांमध्ये आदरायुक्त भीती असावी कारण आजची मुलांमध्ये मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या वागण्यात अनेक वाईट बदल घडवून येताना दिसतात. यासाठी पालकांची बारीक नजर आपल्या मुलावर असली पाहिजे. मुलांच्या हातात मोबाईल न देता पुस्तक द्यावे आणि त्यांना वाचनाची सवय लावावी. निदान एक तास मुलाने वाचन करावे. यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये आमुलाग्रह बदल घडून येतात. हेच वाचन त्यांना भविष्यात यशस्वी ठरेल. असे फातर्फेकर म्हणाल्या. शिक्षक आर. एन .गवस म्हणालेत मोबाईल पासून मुलांना लांब ठेवा. सततच्या वापरामुळे माने सारख्या भागात निरनिराळ्याळा आजारांची वाढ होत आहे. त्या परिस्थितीत सुखी आनंदी जीवन जगा. असे केला तरच तुमचे आरोग्य उत्तम राहील. आरोग्य हीच धनसंपत्ती आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी श्रीमती देऊलकर, गोवेकर, शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, यांनी मनोगत व्यक्त केले. तर भरत दळवी, बाबा टोपले, सुभाष दळवी, मायकल लोबो, आयुब शेख, सतीश अहिरे, तनुजा गावडे, रूपाली जाधव यांनी जुने दिवस जुन्या आठवणी आणि अविस्मरणीय शाळेतील क्षणांना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी, स्वागत परिचय बाबा टोपले, मायकल लोबो, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबीता टोपले, रेखा कविटकर व आभार संजय सातार्डेकर, सतीश आयरे यांनी मानले. स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी संजय धरणे, रेखा कविटकर, मायकल लोबो, इमराणा भरत दळवी, बाबा टोपले, घुसाजी जाधव, संजय सातार्डेकर, सुभाष दळवी, आदींचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg