loader
Breaking News
Breaking News
Foto

१९ वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी संघ विजेता

दापोली (प्रतिनिधी) - टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 वी 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 2025 म्हसवड, सातारा येथे पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी संघ सहभागी झाला होता. या संघांमध्ये कर्णधार रितेश मोतीराम जाधव (खेड), आयुष अजय कोळथरकर (दापोली), यश काशीराम रेमजे (खेड), रोहन रवींद्र खंडागळे (खेड), आर्य योगेश शिर्के (खेड), साहिल सुनील आंब्रे (खेड), रोहित रुपेश धोत्रे (खेड), कुणाल सतीश हरवडे (चिपळूण), आर्यन राजेंद्र खांडेकर (गुहागर), श्रेयश अशोक पाष्टे (गुहागर), पंचशील काशीराम बावदाने (खेड) या सर्व खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करत अंतिम सामन्यामध्ये नाशिक संघाला पराजित करून विजेतेपद पटकावले. आयुष अजय कोळथरकर याला एक सामनावीर चषक, तर कर्णधार रितेश मोतीराम जाधव याला पाच सामनावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक आणि मालिकावीर चषक देऊन सन्मानित केले. या संघाला मार्गदर्शन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव , रत्नागिरी जिल्हा संघ प्रशिक्षक मनोज पकये यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बक्षीस वितरणावेळी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रच्या सचिव मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे, म्हसवड येथील मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व जिल्हा सचिव आणि मॅनेजमेंट कमिटी यांनी रत्नागिरी संघाला प्रमाणपत्र, मेडल आणि चषक देऊन सन्मानित केले. टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित अणेराव, सचिव सिद्धेश गुरव, उपाध्यक्ष प्रणव खानविलकर, खजिनदार सुरज गुरव, सहसचिव सुरज अणेराव, सिलेक्शन कमिटी प्रमुख रोशन किरडवकर, संघ प्रशिक्षक मनोज पकये, सुयश दिवाळे, पियुष पवार, साहिल सावंत, कुणाल हळदणकर, सुनील मोर्ये, गणेश खानविलकर, महेश वीर, सुशांत राईन सर, रमाकांत कांबळे , सागर भारती, प्रथमेश डांगे तसेच रत्नागिरीतून विविध क्षेत्रातून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg