loader
Breaking News
Breaking News
Foto

बिटकॉइन व क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक

बांदा (प्रतिनिधी) - बिटकॉइन व क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी सावंतवाडी आणि बांदा येथील तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात ५०० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीचा सीईओ सुभाष धुरी (वय ४५, रा. बांदा), दिगंबर भट (वय ४०, रा. आरोस, ता. सावंतवाडी) आणि सारिका पिळणकर (वय ४०, रा. सावंतवाडी) यांचा समावेश आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी सांतइस्तेव, गोवा येथील वेनॉन डायस यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार संशयितांनी म्हापसा येथे कार्यालय सुरू करून जमिनीत गुंतवणूक, कंपनीची निवृत्ती वेतन योजना, तसेच बबायोकॉईन व इतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा मोबदला मिळेल, असे आमिष दाखवले. यासाठी संशयितांनी तक्रारदारासह गोव्यातील सुमारे ५०० जणांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. तोरसे–पेडणे येथील जमिनीत भूखंड देण्याचे, तसेच इतर आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन देत संशयितांनी गुंतवणूकदारांकडून २.९० कोटी रुपये गोळा केले. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता संशयितांनी अचानक कार्यालय बंद केले आणि पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणाची दखल घेत ईओसी (आर्थिक गुन्हे शाखा) चे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्यांची पत्नी अश्विनी करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार, २२ डिसेंबर रोजी ईओसी पथकाने सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर यांना अटक करत पुढील कारवाई केली. या बहुचर्चित आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg