loader
Breaking News
Breaking News
Foto

तायक्वांदो खेळाडू आराध्या कोळंबेकरचे यश गौरवास्पद

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या आराध्या कोळंबेकर हिचे यश हे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायक असून मंडणगडसाठी गौरवास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी प्रतिपादन केले. तायक्वाॅंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तायक्वाॅंडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे 35 वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वाॅंडो स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी जिल्हा सुवर्णपदक विजेती खेळाडू आराध्या कोळंबेकर ची निवड झाली तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देताना पोलीस निरीक्षक नितीन गवारे बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धा वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे दिनांक 26 ते 28 या कालावधीत संपन्न होणार आहेत. मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमी तर्फे भोसले प्लाझा येथे आराध्या कोळंबेकर हिचा सत्कार व शुभेच्छा चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक गवारे, अर्जुन दादा भोसले, क्लब अध्यक्ष व नगरसेवक आदेश मर्चंडे, रत्नागिरी जिल्हा तायक्वाॅंडो स्पोर्ट असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तायक्वांडो अकॅडमी मंडणगडचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, उम्मे खदीजा स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका अमिना खान, प्रशिक्षिका काजल लोखंडे, विनोद पवार, शेख, सृष्टी लोखंडे यांच्यासह खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg