loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील नारकर मैदानावर उद्या 'द फोक आख्यान' कार्यक्रम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : मराठी संस्कार, संस्कृती आणि लोककलेचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारा आणि भारतातच नव्हे तर जगभरात हाऊसफुल होणारा मराठी कार्यक्रम 'द फोक आख्यान' हा बुधवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून लांजा येथील नारकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.  राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तो तमाम लांजा वासियांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगीत हा भारतीय लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. तर महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला जसे भारुड, लावणी, गवळण, ओवी आणि लोक संगीताला आधुनिक पद्धतीने सादर करणारा एकमेव लोकप्रिय संगीतमय कार्यक्रम म्हणजे द फोक आख्यान होय. हा कार्यक्रम मूळ लोककला जतन करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात ईश्वर अंधार यांची कथा आणि हर्ष विजय यांचे संगीत आहे. आणि त्याला जगभरात विदेशात प्रचंड असा प्रसाद मिळत आहे. असा हा कार्यक्रम लांजा वासियांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

टाईम्स स्पेशल

द फोक आख्यान म्हणजे मराठी लोक संगीताचा व रोमांचकारी अनुभव देणारा जुन्या आणि नव्याचा संगम साधणारा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारा एक अप्रतिम कार्यक्रम आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी आणि सादरीकरण असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण याचा आनंद घेऊ शकतात. या कार्यक्रमाचा तमाम लांजावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किरण सामंत यांच्यासह लांजा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg