loader
Breaking News
Breaking News
Foto

​योगायोग मित्रमंडळ हातखंबा तर्फे राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून 'नववर्ष 2026' दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन; गरजू १०० शेतकऱ्यांना शेती साहित्याचे वाटप

​हातखंबा(प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकीचा ३५ वर्षांचा वारसा जपणाऱ्या 'योगायोग मित्रमंडळ, हातखंबा'च्या वतीने 'नववर्ष २०२६' दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) प्रकाशन सोहळा मंगळवार, २३ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात केवळ दिनदर्शिकेचे प्रकाशनच झाले नाही, तर गावातील १०० गरजू शेतकऱ्यांना 'फायबर घमेली' भेट देऊन एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण करण्यात आला.​हातखंबा ग्रामपंचायत हॉलमध्ये आयोजित या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासू व प्रगतीशील शेतकरी मा. उदयजी बने आणि प्रसिद्ध उद्योजक मा. बाबूशेठ म्हाप यांच्या शुभहस्ते नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून जमा होणारा निधी वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांसाठी वापरला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तज्ञांकडून शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. किरण माळशे (केंद्रप्रमुख, नारळ संशोधन केंद्र, भाट्ये) यांनी नारळ बागायतीमधील आधुनिक प्रयोगांवर भर दिला. डॉ. सुदेश चव्हाण (कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, लांजा) यांनी पिकांवरील कीड नियंत्रणाचे प्रभावी उपाय सांगितले. रत्नागिरीचे तालुका कृषी अधिकारी मा. विनोद हेगडे यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य विद्याताई बोंबले, ऐश्वर्याताई जठार, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, मा. भाई तारवे, ग्रामसेवक दीपक पाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच मंडळाचे सचिव श्री. सचिन सावेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ​मंडळाचे ज्येष्ठ सदस्य महेश खानविलकर, ओमकार कोळवणकर, संतोष गुरव, संदीप गुरव, अभिजीत गुरव, केदार गुरव, विजू शिंदे, बापू डांगे, विकास तारवे, रवी सनगरे आणि गजानन कामेरकर यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वी झाला. हातखंबा पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg