दाभोळ (वार्ताहर) - रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले पालगड (घेरा पालगड) ता.दापोली या ठिकाणी २१ डिसेंबर २०२५ या दिवशी सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये खेड आणि दापोली येथील युवा तसेच हिंदू धर्माभिमानी यांनी सहभाग घेतला होता. पालगड येथील धर्मप्रेमी विकास वेदक यांनी सर्वांना सकाळचा अल्पोपहार दिला. तर दुपारच्या जेवणासाठी सर्व गडप्रेमींनी स्वतःचा डबा बरोबर आणला होता. या उपक्रमात 39 गडप्रेमींनी सहभाग घेतला.
या उपक्रमाचा प्रसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता. यासाठी मुंबईमधून येऊन सर्वेश सुधाकर आरेकर हे सहभागी झाले होते. तसेच खेड येथील गडप्रेमी नितीन विठोबा दिवटे वय ७० वर्षे यांचा सहभाग तरुणांना प्रेरणादायी होता. या मोहिमेमध्ये गव्हे तालुका दापोलीचे सरपंच लक्ष्मण गुरव यांनी विशेष सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी वनौशी, करजगाव, लाडघर, खेड, भिलारे- आयनी, दापोली अशा विविध गावातून 39 गडप्रेमी दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी प्रारंभी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दुर्ग पूजनामध्ये भगवा ध्वज उभारून त्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गडाची स्वच्छता करण्यात आली. दुपारच्या महाप्रसादानंतर गडप्रेमींना धर्म शिक्षणाचे महत्त्व आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक नामजप करण्यात आला आणि शेवटी स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचा सराव घेण्यात आला.


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.