कर्जत (विजय मांडे) - कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र दगडे ४४७० मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांचा पराभव केला. विशेष म्हणजे दगडे यांनी पहिल्या फेरी पासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. तसेच परिवर्तन विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आल्याने त्यांची निर्विवाद सत्ता कर्जत नगरपरिषदेत आली.
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत परिवर्तन विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय यांची महायुती करण्यात आली होती, निवडणुकीत नगर परिषदेवर कर्जत परिवर्तन विकास आघाडीने झेंडा फडकवला आहे, यामध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे - ८, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे - ४ अपक्ष - १ असे १३ उमेदवार निवडून आले आहेत तर महायुतीमध्ये शिंदे गटाचे- ७ भाजपचा - १ असे आठ उमेदवार निवडून आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रायगडचे अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनीही मतमोजणी ठिकाणी भेट दिली.
निकाल..... प्रभाग क्रमांक 1 अ ) अरुणा प्रदीप वायकर: शिवसेना शिंदे गट : विजयी (1197 ) ब ) किशोर पांडुरंग कदम: शिवसेना शिंदे गट : विजयी (956) प्रभाग क्रमांक 2 अ) कोयल चैतन्य कन्हेरीकर: शिवसेना शिंदे गट : विजयी (1306 ) ब ) ) संकेत जनार्धन भासे: शिवसेना शिंदे गट : विजयी (1439) प्रभाग क्रमांक 3 अ ) अंजली अतुल कडू राष्ट्रवादी गट : विजयी (1167 ) ब ) संतोष सुरेश पाटील : उबाठा गट : विजयी (936) प्रभाग क्रमांक 4 अ ) सुनिता योगेश गायकवाड राष्ट्रवादी गट : विजयी (1194 ) ब ) महेंद्र बबन चंदन : राष्ट्रवादी गट : विजयी (1563) प्रभाग क्रमांक 5 अ ) राधिका पिंट्या पवार राष्ट्रवादी गट : विजयी (934) ब ) विजय किसन हजारे शिवसेना शिंदे गट : विजयी (867) प्रभाग क्रमांक 6 अ ) सुवर्ण केतन जोशी उबाठा गट : विजयी (1477) ब ) प्रशांत वसंत पाटील अपक्ष (परिवर्तन आघाडी पुरस्कृत ) गट : विजयी (1397) प्रभाग क्रमांक 7 अ ) वैभव हेमंत सुरावकर शिवसेना शिंदे गट : विजयी (1276 ) ब ) नेहा निलेश शिंदे राष्ट्रवादी : विजयी (1092) प्रभाग क्रमांक 8 अ ) रामदास आत्माराम गायकवाड भाजपा गट : विजयी (923 ) ब ) सुचिता देवेंद्र खोत उबाठा गट : विजयी (1344) प्रभाग क्रमांक 9 अ ) कुमेश पांडुरंग मोरे राष्ट्रवादी गट : विजयी (1441 ) ब ) जानवी सुदेश देवघरे शिवसेना शिंदे गट : विजयी (1251) प्रभाग क्रमांक 10 अ ) हर्षाली उमेश गायकवाड राष्ट्रवादी गट : विजयी (1762) ब ) अशोक बबन राऊत राष्ट्रवादी गट : विजयी (1479) क) मानसी महेंद्र कानिटकर उबाठा गट : विजयी (1580)


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.