loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड बसस्थानकात महिलेचे २ लाख ५३हजार रुपये किंमतीच्या दागिन्यासह रोकड चोरीस

खेड (वार्ताहर) - शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधून २ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड रक्कम चोरल्याची घटना १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभांगी दत्ताराम खापरे (वय ६३, रा. कसबा, लावगणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खेड येथील बसस्थानकावरून खेड ते मंडणगड या बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चैन उघडून पर्समधील मुद्देमाल लंपास केला.

टाइम्स स्पेशल

चोरट्याने १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याचे एक सर असलेले मणी मंगळसूत्र, १ लाख रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची माळ तसेच ३ हजार २०० रुपये रोकड, असा एकूण २ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg