loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत ‘बुक्स ऑन व्हील्स’ दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली असताना, इतिहास आणि वास्तवाची सांगड घालून प्रगती साधण्यासाठी पुस्तकेच आपले खरे ‘दैवत’ आहेत. हे दैवत प्रत्येकाने हाती बाळगावे, असे आवाहन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले. ​केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘नॅशनल बुक ट्रस्ट फिरती पुस्तक परिक्रमा’ (Books on Wheels) बसचे सावंतवाडीत आगमन झाले. सावंतवाडी बस स्थानक येथे या उपक्रमाचे उद्घाटन विक्रांत सावंत आणि अखिल मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, कणकवली आणि कुडाळ येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये या बसला मोठा प्रतिसाद मिळाला. सावंतवाडीत बोलताना विक्रांत सावंत पुढे म्हणाले की, "पुस्तकांची ही फिरती व्हॅन म्हणजे वाचन चळवळ व्यापक करण्यासाठी टाकलेले एक कौतुकास्पद पाऊल आहे. सुज्ञ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे." ​याप्रसंगी गजानन नाईक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, विजय देसाई, अभिमन्यू लोंढे, रुपेश हिराप, कुणकेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, संजय पुनाळेकर, निलांबरी पेडणेकर, रेषा सावंत तसेच अमित कुमार मिश्रा, सुनील कुमार, गजराज सिंग, जगतसिंग रावत, उमेश राठोड आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

​सावंतवाडी बसस्थानक येथे पहिल्याच दिवशी शेकडो वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. ही बस २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत सावंतवाडीत असणार आहे. प्रदर्शनाचे पुढील वेळापत्रक ​२६ डिसेंबर (शुक्रवार): श्री पंचम खेमराज महाविद्यालय परिसर आणि राणी पार्वती देवी हायस्कूलचे मैदान. वेळ: सकाळी १० ते सायंकाळी या वेळेत ही बस वाचकांसाठी उपलब्ध असेल. ​या फिरत्या पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील दुर्मिळ आणि ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या वाचन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg