loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावर पुन्हा चुकीचा दिशादर्शक फलक; खाजगी बस चालकांची दिशाभूल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत असून खाजगी आराम बस चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोनवी पुलाजवळ खालच्या बाजूने मुंबईकडे जाण्यासाठी संबंधित रस्त्याचा वापर करा, असा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. मात्र, याच रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढला आहे. चुकीच्या फलकामुळे अनेक खाजगी आराम बस चालक चुकीच्या मार्गाने जात असून, अरुंद व खोदाई केलेल्या रस्त्यावरून बस वळवताना मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी प्रवाशांना उशीर, गैरसोय व धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकाराबाबत ठेकेदार कंपनीचा गलथान कारभार उघड झाला असून, महामार्ग बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दिशादर्शक फलक लावण्याआधी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी न केल्याने ही गंभीर चूक झाल्याचे बोलले जात आहे. संगमेश्वरवासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करत, चुकीचा दिशादर्शक फलक त्वरित हटवून योग्य व स्पष्ट फलक लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg