loader
Breaking News
Breaking News
Foto

संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडीने गारठला

नवी दिल्ली. संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडीने होरपळत आहे. डोंगरांपासून मैदानी भागात तापमानाचा पारा सातत्याने खाली येत आहे. पर्वतीय भागात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातही थंडी वाढली आहे. सोमवारी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची लाट पसरली होती. महाराष्ट्रातही थंडीत वाढ झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शीत वारे पुन्हा राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. पण, हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्राला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. रविवारी राज्यात परभणी आणि धुळे या दोन जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

उत्तर प्रदेशातही थंडीची लाट आणि तीव्र थंडीचा तडाखा बसला आहे. बांदा येथे एका शेतकऱ्याचा आणि एका तरुणाचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी कानपूर, बाराबंकी, अयोध्या आणि लखनऊसह राज्यातील 40 हून अधिक जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पडली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg