loader
Breaking News
Breaking News
Foto

पी.डी. विद्यालय व दि. प. (काकासाहेब) दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय केळशी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील दांडेकर हायस्कूलमध्ये दिनांक 22 डिसेंबर ते दिनांक 24 डिसेंबर 2025 या तीन दिवसांत वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. दरवर्षीप्रमाणे पी. डी.विद्यालयांमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य दीनानाथ रेवाळे यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक अशोक केळकर सर तसेच ग्रुप ग्रामपंचायत आंबवली चे माजी सरपंच संदीप चिखले यांचे योगदान लाभले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण अध्यक्ष दीनानाथजी रेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अशोक केळकर यांच्या हस्ते, तसेच ग्राउंडचे उद्घाटन संदीप चिखले यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक शिक्षक राहुल बोबडे यांनी विद्यार्थ्यांकडून शपथविधी करून घेतला. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर संस्थाचालक, मुख्याध्यापक, पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी बादली चेंडू टाकणे हा खेळ घेण्यात आला. सर्वांनी याचा आनंद घेतला. अध्यक्षांनी खेळ व आपल्या जीवनात शिस्त, खेळाडूवृत्ती यांचे पालन करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये लंगडी, बुद्धिबळ, धावणे, बॉल पासिंग, डॉजबॉल, दांडा खेच, संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत, दोरी उड्या, थाळीफेक,गोळा फेक, उंच उडी, लांब उडी, जलद सायकल, रिले ,कबड्डी यांसारखे सांघिक खेळ व वैयक्तिक खेळ घेण्यात आले. वैयक्तिक क्रीडा स्पर्धा समुद्रावर घेण्यात आल्या. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.

टाइम्स स्पेशल

या क्रीडा स्पर्धेत 20 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला. दांडेकर कुटुंबीयांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून वस्तुरूपाने खेळाडूंना बक्षिसे गव्हर्निंग कौन्सिलचे कार्याध्यक्ष गिरीश जोशी यांच्या शुभहस्ते देण्यात आली. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक प्रकाश सोनवलकर, सहाय्यक शिक्षक राहुल बोबडे, क्रीडा प्रमुख प्रशांत जाधव, प्रभाकर कांबळे, अविनाश सागर, हेमंत वर्तक, प्रकाश धावरे, यामिनी लिमये, विद्या पारधी, साधना धावरे, शुभांगी अहिरे, सलवा झोबडकर या सर्व सहाय्यक शिक्षक, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी कनिष्ठ लिपिक नितीन बांदरकर, सुशांत पेटकर, विवेक शिंदे.. या सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राहुल बोबडे यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रकाश धावरे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg