loader
Breaking News
Breaking News
Foto

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन

मालवण (प्रतिनिधी) - बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी दि. २४ डिसेंबर रोजी मालवण भरड नाका येथे सकाळी ११ वा. हिंदू बांधव भगिनींना एकत्र येण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल मालवण यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांगलादेशमधील हिंदूवर अनन्वित अत्याचार होत आहेत. हिंदूना केवळ ते हिंदू आहेत म्हणून बांगलादेश मध्ये जाहीररित्या मारत झोडत शहराच्या मधोमध झाडाला लटकवून फाशी दिले जात आहे आणि जिवंत जाळले जात आहे. जोपर्यंत तेथे हिंदू बहुसंख्य होता आणि हिंदू म्हणून जागृत होता तोपर्यंत तेथील हिंदू सुरक्षित होता. परंतू आता तेथील स्थिती प्रचंड बदलली आहे, आता तेथे हिंदुना जिवंत राहणे सुद्धा अशक्य झाले आहे. आज सर्व धर्मीयांना भारतामध्ये ही धार्मिक स्वतंत्रता लाभते आहे. ती केवळ या देशांमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत म्हणूनच लाभते आहे.

टाईम्स स्पेशल

आपल्या देशातील संविधान सुरक्षित रहावे, असे वाटत असेल तर हिंदूनी आपण हिंदू आहोत हे कायम ध्यानात ठेवून जीवन जगलो तरच आपण सुरक्षित राहू. आपल्या भावी पिढी सुरक्षित राहतील आणि भारत सुरक्षित राहील. ही बाब पुन्हा एकदा बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचारांमुळे अधोरेखित झालेली आहे. त्यामुळे मालवणातील तमाम हिंदू बांधवांना बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि तेथील हिंदुना पाठिंबा देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg