बांदा (प्रतिनिधी) - गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होत असलेला गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत अंदाजे ५० लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. २५ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता इन्सुली तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (क्र. GJ-17-XX-0871) वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये १३ मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले.
तपासणीत रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या प्रत्येकी ४८ सिलबंद बाटल्या असलेल्या एकूण ६५० काड्या (३१,२०० बाटल्या) सापडल्या. हा संपूर्ण मद्यसाठा अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी वाहनचालक यशेश कुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५०, रा. वारसिया, वडोदरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ४०.५६ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा, १० लाख रुपये किमतीचे कंटेनर वाहन, तसेच १० हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत ५०.६६ लाख रुपये आहे.
सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. पी. सुबे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे व विवेक कदम, तसेच जवान रणजित शिंदे, दीपक वायंदे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतीश चोगुले यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.