loader
Breaking News
Breaking News
Foto

शेकोटीत तोल जाऊन पडल्याने आगीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

बांदा (प्रतिनिधी) - शेर्ले-आरोसबाग येथे न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीत तोल जाऊन पडल्याने आगीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची खबर त्यांचा मुलगा दत्तप्रसाद चांदेकर याने बांदा पोलिसात दिली आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चांदेकर हे दररोज पहाटे उठून न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी विस्तव पेटवत असत. त्यानंतर त्यांचा दिनक्रम सुरु व्हायचा. आज पहाटे देखील त्यांनी लवकर उठून घराशेजारी असलेल्या न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी चूल पेटविली होती. पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका असल्याने ते शेकोटी घेत बसले होते. थंडीपासून बचावासाठी शेकोटी घेत असतानाच अचानक आग भडकली. लागतच्या माडाच्या झावळानी देखील पेट घेतला. आग विझविण्याच्या प्रयत्नात ते तोल जाऊन शेकोटीत पडले. यात अविनाश चांदेकर गंभीररीत्या होरपळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

टाइम्स स्पेशल

अविनाश चांदेकर हे बांदा येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते आणि तेथून ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश कुडतरकर करत आहेत. मयत चांदेकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg