loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वर्गिय विकासभाई सावंत यांच्या नावाने पुढील वर्षीपासून आदर्श पुरस्कार दिला जाणार - विक्रांत सावंत

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गिय विकासभाई सावंत यांच्या नावाने पुढील वर्षीपासून आदर्श पुरस्कार दिला जाणार आहे अशी घोषणा मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केली. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानस अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानाहून बोलताना विक्रांत सावंत म्हणाले, स्व. विकास सावंत यांच स्मरण सदैव होत. त्यांनी उणीव पावला पावलावर भासते. आमची ताकद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. या शाळेचा, कॉलेजचा श्वास ते आहेत. स्व. भाईसाहेब सावंत यांचा वारसा अन् स्व. विकास सावंत यांची शिकवण घेऊन कार्यरत राहणार विद्यार्थांना चांगल्या सुविधा संस्था म्हणून देणार असून पुढील वर्षीपासून स्व. विकासभाई सावंत आदर्श पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, अमोल सावंत, प्रा. सतिश बागवे, च.मु. सावंत, संदीप राणे, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रिती सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी सोहम पालव, सानिका ठाकूर, सांस्कृतिक प्रमुख ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्त रजपूत आदी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी, प्रा. मिलिंद कासार, कौचरेकर यांनी केल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg