loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरे–बुरंबी (ब्राम्हणवाडी) येथील माजी सैनिक हनुमंत बाईत यांचे निधन

तेरे–बुरंबी — येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सैनिक हनुमंत आत्माराम बाईत (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता निधन झाले. हनुमंत बाईत हे सन १९६५ मध्ये भारतीय सैन्यात देशसेवेसाठी भरती झाले होते. त्यांनी तब्बल २२ वर्षे निष्ठेने देशसेवा करून निवृत्ती स्वीकारली. सन १९७१ च्या भारत–पाक युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. सैन्य सेवेदरम्यान त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शासनातर्फे त्यांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात सेवा करण्याची त्यांच्या मुलांची इच्छा होती; मात्र उंचीअभावी त्यांना सैन्यात प्रवेश मिळू शकला नाही. आजोबांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मोठ्या मुलाचा मुलगा चि. प्रथमेश बाईत यांनी कठोर परिश्रम घेतले असून सध्या ते भारतीय सैन्यात देशसेवा करत आहेत. त्यांच्या पश्चात मुलगे प्रताप व नंदकिशोर, सुन सपना, नातू प्रथमेश (सैनिक), चेतन व नातसून श्रावणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg