loader
Breaking News
Breaking News
Foto

विकास कुलकर्णी यांना सह्याद्रिरत्न पुरस्कार

दोडामार्ग (वार्ताहर) - गोवा राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विकास कुलकर्णी यांची टॅलेंट कट्टा ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सह्याद्रिरत्न पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार रविवार, दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी पुणे येथील S. M. जोशी सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. विकास कुलकर्णी यांनी गोवा राज्यासह दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये आरोग्य सेवांच्या माध्यमातून मोलाचे कार्य केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आरोग्य एक्सप्रेसच्या माध्यमातून ते नियमितपणे आरोग्य सेवा पुरवत असून, अनेक गरजू नागरिकांना याचा लाभ झाला आहे. तसेच विविध दात्यांच्या सहकार्याने वंचित व गरजू घटकांना मदत करून त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांची सह्याद्रिरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दोडामार्ग तालुक्यातील अनेक सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. Voluntary Health Association या नावाने ओळखली जाणारी संस्था गेल्या १२ वर्षांपासून अतिदुर्गम व मागास भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. आरोग्याबरोबरच पाणीपुरवठा तसेच शिक्षणाच्या सुविधांच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतून ही संस्था महत्त्वपूर्ण व उपयुक्त कार्य राबवत आहेत.

टाइम्स स्पेशल

गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत Voluntary Health Association ने गोवा शिपयार्ड, सॅनोफी, सिप्ला, टाटा, युनिकेम, ग्लेनमार्क, गोदरेज तसेच राज्य आरोग्य विभाग यांच्यासोबत समन्वय साधून विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. सध्या कलरकॉन एशिया प्रा. लि., डीएसव्ही फाउंडेशन तसेच राज्य आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने विविध आरोग्यविषयक प्रकल्प सुरू आहेत. याशिवाय हिमाचल प्रदेश, मणिपूर, लडाख आणि मिझोरम या इतर राज्यांतील प्रकल्पांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही ही संस्था प्रभावीपणे पार पाडत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg