loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमजाई स्टोन क्रेशर येथे सुरुंग स्फोटके लावल्याबाबत पिंपर वरचीवाडी ग्रामस्थांचा ग्रा.पं.वर मोर्चा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील पिंपर येथील सोमजाई स्टोन एंटरप्रायझेस क्रेशर येथे सुरुंग स्फोटके लावल्याबाबत पिंपर वरचीवाडी ग्रामस्थांच्यावतीने पिंपर ग्रामपंचायतवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत पिंपर आपल्या अधिपत्याखाली असतांना, सोमजाई स्टोन एंटरप्रायझेस क्रेशरने धोकादायक सुरूंग स्फोट घडवून आणले आहेत. याने जीवितहानी होणे संभव आहे. बुधवार दिनांक २४/१२/२०२५ रोजी दुपारी २ ते २:१५ दरम्यान जो सोमजाई स्टोन क्रेशरने भुमीगत सुरुंग स्फोट घडवून आणला, इतक्या तीव्रतेचा भयावह स्फोट अजूनपर्यंतच्या कालखंडात झाला नव्हता, स्फोटकांचा दुर्गंधीयुक्त वास स्थानिकांचा श्वास गुदमवणारा असून जमिन हादरुन भूकंपाची जाणिव झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असते, या अनुषंगाने वरचीवाडी रहिवाशांनी ग्रामपंचायतीत धाव घेतली, तेव्हा स्थानिकांच्या निदर्शनास आले की, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका, सरपंच व उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सभासद यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. याचे कारण काय? तद्नंतर ग्रामस्थांनी पिंपर गावचे पोलिस पाटील तसेच तलाठी आणि सर्कल यांच्याशी संपर्क साधला, ते तातडीने ग्रामपंचायत ऑफिसमध्ये उपस्थित झाले. ग्रामस्थांनी त्यांची व्यथा लिखीत स्वरुपात व्यक्त केली आहे, त्याची शहानिशा करण्यासाठी वरील सर्व अधिकारी सोमजाई स्टोन क्रेशर येथे गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की सुरूंग स्फोट घडवून आणला होता. या निवेदनावर सर्व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg