loader
Breaking News
Breaking News
Foto

जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजापूरच्या नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

राजापूर (वार्ताहर) नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीच्या ऍड.हुस्नबानू खलिफे यांनी आपल्या सहकारी पक्षांतील नवनिर्वाचित नगरसेवकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत बुधवारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला. नगराध्यक्षा ऍड.हुस्नबानू खलिफे यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यामुळे आता गेले सुमारे चार वर्षे असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिंधीकडून कारभार सुरू झाला आहे. बुधवारी जवाहर चौकात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ऍड.खलिफे यांनी नगरपरिषदेत प्रवेश केला. तत्पूर्वी जवाहर चौकात उपस्थित पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत भविष्यात राजापूर शहराचा विकास आपल्याला जोमाने करायचे असल्याचे सांगितले. ज्या विश्‍वासाने राजापूरकरांनी आपणाला निवडून दिले आहे तो विश्‍वास कामाच्या माध्यमातून आपण सार्थ ठरवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर जवाहर चौकातील दर्ग्यावर त्यांनी चादर चढवून प्रार्थना केली. ऍड.खलिफे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी नगर परिषदेत प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नगरपरिषदेतील महिला कर्मचा-यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार गणपतराव कदम, नगरसेवक जमिर खलिफे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, उबाठाचे नेते रविंद्र डोळस, कॉंग्रेस शहराध्यक्ष अजिम जैतापकर, शिवसेना शहरप्रमुख संजय पवार, उपशहरप्रमुख उमेश कोळवणकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष सातोसे आदिंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg