loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा शहरात उद्या बजरंग दलाचे शौर्य संचलन

म्हसळा (प्रतिनिधी) - प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रहिताचे कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांच्या वतीने उद्या गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी म्हसळा शहरात शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात हिंदुत्व व राष्ट्रवादी विचारधारा समाजात रुजविण्यासाठी विश्व हिंदू परिषदे कडून सातत्याने धार्मिक, सामाजिक व देशहितकारी उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हे शौर्य संचलन काढण्यात येत आहे. हे संचलन सायंकाळी ३ वाजता म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानातून सुरू होऊन श्री धावीर मंदिर पटांगणापर्यंत जाणार आहे. या शौर्य संचलनात म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील सर्व हिंदू धर्मप्रेमी नागरिक, युवक व महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. अनिकेत ठाकूर (रायगड विभाग सहमंत्री, विश्व हिंदू परिषद) यांनी पत्रकारांजवळ वार्तालाप करताना केले.या वेळी जिल्हा मंत्री जितेंद्र करंजीकर, म्हसळा प्रखंड गोरक्षा प्रमुख प्रसन्न निजामपूरकर, प्रखंड मंत्री प्रितम धिमर, पदाधिकारी रोहन म्हात्रे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीसह देशभरात बांगलादेश विरोधात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन सुरू असतानाच म्हसळा शहरात हे शौर्य संचलन होत असल्याने, प्रशासन, गृह विभाग व विविध राजकीय पक्षांचे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष असल्याचे चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg