loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख व जतन करण्याच्या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक वारसा या विषयावर अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून “ विविधतेत एकता ” (Unity in Diversity) ही संकल्पना प्रभावीपणे साकारली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर, केरळ, बंगाल, आसाम आदी राज्यांची संस्कृती दर्शविणारे वेश, दागिने व पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, पारंपरिक चाल-ढाल व सांस्कृतिक प्रतीकांच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारसा जतनाची भावना निर्माण झाली. शाळेतील समाजशास्त्र विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शाळा प्रशासनाने अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव बळकट होते, असे मत व्यक्त केले. रोटरी शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता भारतीय संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला असून कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg