सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन शनिवार २७ आणि रविवार २८ डिसेंबरला सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत होत आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाभरातून साहित्यिक, कवी या संमेलनासाठी येणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवयित्री नीरजा भूषविणार असून उद्घाटक म्हणून साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे तर विशेष उपस्थिती डॉ. दासू वैद्य, प्रकाश होळकर, प्रा. श्रीधर नांदेडकर, अभिनेत्री संपदा कुलकर्णी-जोगळेकर आदी नामवंत साहित्यिक, कवीं राहणार आहे. दोन दिवस चालणार्या या संमेलनात विशेष मुलाखत, परिसंवाद, कवी संवाद, विस्मरणातील कविता, कवी संमेलन असे साहित्यिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संमेलनात नवसाहित्यिक, लेखक, कवी घडविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष निमंत्रित म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळो अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, महाराष्ट्र राज्य सहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य तथा शेखर सामंत, भरत गावडे, विठ्ठल कदम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी, वामन पंडित, म. ल. देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. दासू वैद्य, प्रकाश होळकर, प्रा. श्रीधर नांदेडकर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० पर्यंत ग्रंथदिंडी शहरातून निघणार आहे. त्यात तालुक्यातील शाळा व महाविद्यालयों विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळीत सिंधुदुर्गातील लोककलांचे सादरीकरण होणार आहे. संमेलन उद्घाटन रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११. ३० या वेळेत होणार आहे. यावेळी जिह्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व युवा मान्यवरांचा सत्कार सोहळा, संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान होणार आहे. त्यानंतर पहिल्या सत्रात सकाळी ११.३० ते १२.४५ या वेळेत अभिनेत्री डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांची मुलाखत डॉ. सुमेधा नाईक धुरी, प्रा. अमर प्रभू घेतील. दुसरे सत्र दुपारी १२.१५ ते १.३० या वेळेत ‘सिंधुदुर्गातील अलक्षित साहित्यिक’ या विषयावर होणार आहे. यात अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण लळीत, वक्ते डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. एन. डी. कार्वेकर, प्रा. वैभव साटम यांचा सहभाग आहे. भोजनानंतरच्या तिसऱया सत्रात दुपारी २.१५ ते ३.३० या वेळेत ‘विविध साहित्य प्रवाहांना सिंधुदुर्ग जिह्याचे योगदान’ या विषयावरील परिसंवादाया अध्यक्षस्थानी लेखिका उषा परब, वक्ते डॉ. शरयू असोलकर, अंकुश कदम, डॉ. सई लळीत, कल्पना मलये यां सहभाग आहे. चौथ्या सत्रात काव्योत्सव अंतर्गत ‘कवी संवाद’ होणार असून त्यात दासू वैद्य, प्रकाश होळकर, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर यां सहभाग असून संवादक नंदकुमार पाटील असतील.
‘विस्मरणातील कविता’ कार्यक्रमात मालवणी कवी दादा मडकईकर, वामन पंडित, सरिता पवार, केदार म्हसकर, विजय ठाकर हे कविता सादर करणार आहेत. त्यानंतर मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून त्यात नीलम यादव, भाऊसाहेब गोसावी, अनुराधा आचरेकर, सोनाली नाईक, संजय तांबे, स्नेहा कदम, अनिल जाधव, प्रसाद खानोलकर, हरिश्चंद्र भिसे, किशोर वालावलकर, प्रीतम ओगले, निशिगंधा गावकर, मंजिरी मुंडले, प्रणिता तांबे, विजय सावंत, मनोहर परब, मधुकर मातोंडकर, दर्शना कोलते, अजित राऊळ, आर्या बागवे, श्रेयश शिंदे आदी सहभागी होणार आहेत. त्यानंतर समारोप सायंकाळी 5 वाजता संमेलनाध्यक्षा नीरजा यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, संस्थाध्यक्ष प्रसाद पावसकर, विशेष अतिथी डॉ. दासू वैद्य, प्रकाश होळकर, प्रा. श्रीधर नांदेडकर व निमंत्रित संदीप निंबाळकर, रमेश बोंद्रे तसा आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.