loader
Breaking News
Breaking News
Foto

आगामी जि.प. व पं. स. निवडणुकीची रणनिती आखाण्यासाठी शिवसेना उबाठा दोडामार्ग तालुका समन्वय समिती जाहीर

साटेली (प्रतिनिधी) - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणनीती व प्रचार प्रसिध्दीसाठी दोडामार्ग शिवसेना तालुक्याच्यावतीने तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली.तालुका समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. यांत प्रामुख्याने लक्ष्मण आयनोडकर, नगरसेवक चंदन गावकर, विजय जाधव, विनिता घाडी, माजी जि.प.सदस्य संपदा देसाई, मदन राणे, मिलिंद नाईक, संदेश राणे यांचा समावेश असेल तर तीन्ही विभागप्रमुखांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुका समन्वय समिती ही उमेदवार निवड, इतर पक्षांनी आघाडी करणे, प्रचार यंत्रणा राबविणे आदी बाबत सर्वानुमते निर्णय घेतील. माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हासंपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर ही समिती माजी आमदार, परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख कालिदास कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. त्यामुळे पक्षाला जि.प.व प.स. निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागणार असून सत्ताधारी पक्षांचे अपयश, जनतेसमोर मांडण्यासाठी सज्ज आहेत, असे मत तालुका प्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg