loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतवडे ग्रामपंचायतमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी (वार्ताहर) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कोतवडे व प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, रक्तदाब तपासणी , मधुमेह तपासणी , HBA१C तपासणी , नेत्र तपासणी या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .सदर शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामस्थानी लाभ घेतला. ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आवश्यक तपासण्या करू शकत नाहीत तसेच तपासण्या खर्चिक असल्याने गोरगरीब जनता ह्या तपासण्या करू शकत नाहीत म्हणून सदर शिबिर स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत मार्फत आयोजित केले असल्याची माहिती सरपंच संतोष बारगोडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ , ग्रामपंचात अधिकारी देविदास इंगळे , संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष स्वप्नील मयेकर,ग्रामपंचायत सदस्य सौ.दिया कांबळे, विस्तार अधिकारी पी.एन.सुर्वे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गौरी कांबळे, आरोग्य सेवक संकेत पंडिये, लॅब टेक्निशियन सौ.नेहा जाधव, नेत्र तपासनीस विजय मोरे, आशा सेविका सौ.वर्षा जोगळेकर, स्नेहल माने, सुनीता शितप, वैष्णवी लांजेकर, दीक्षा सकपाळ , अंगणवाडी सेविका सौ.प्रीती बारगोडे , रेश्मा जोशी, वारणा ठोंबरे ग्रामपंचायत कर्मचारी भालचंद्र लिंगायत,सौ. प्राप्ती बारगोडे, मयुरी भोसले, भक्ती नाचणकर, सूरज इमल, अशोक कुरटे, मयूर कांबळे, यश लिंगायत आणि कोतवडे परिसरातील ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg