loader
Breaking News
Breaking News
Foto

ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा सेनेच्यावतीने आज रक्तदान शिबिर संपन्न

रत्नागिरी - राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने युवा सेना रत्नागिरी च्या वतीने 25 डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवा सेनेच्या वतीने दरवर्षी ना. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व अन्य सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. रक्तदान हे जीवनदान याच भावनेतून या शिबिराचे आयोजन 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले होते जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा पाहुन ना. सामंत यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आणि सामाजिक आदर्श घडवला. युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान कले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रक्तदान शिबिरा प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, शिबिराला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंदन, शहर प्रमुख बिपीजी बंदरकर, महिला तालुकाप्रमुख कांचनताई नागवेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, दिशा साळवी, मेधा कुलकर्णी, सायली पाटील, प्रीती सुर्वे, अफ्रीन होडेकर, प्रिया साळवी, निमा सावंत, दत्तात्रय साळवी, निमेश नायर, गणेश भारती, दीपक पवार, विकास पाटील, सौरभ मलुष्टे, प्रशांत सुर्वे, राकेश उर्फ घारु साळवी, अभिजीत दुडे, प्रथमेश साळवी, देवदत्त पेंडसे, रोहित हर्षराज पाटील, रितेश साळवी, भिजीत घोडके, प्रशांत चाळके, दुर्वेश पांगम, सर्वेश शेलार, अभिषेक पेजे, अमित तोडकरी, सिद्धी शेटे, सुमित नाईक, प्रशांत जांगळे, अनिकेत चव्हाण, सुमित राणे, औदुंबर कळंबटे, प्रवीण साळवी, अजिंक्य नाईक तसेच सर्व शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg