loader
Breaking News
Breaking News
Foto

खाडी समांतर रस्ता धोक्यात; डिंगणी–फुणगुस मार्गावर अपघाताचा धोका वाढला

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ते फुणगुस हा खाडी समांतर रस्ता सध्या गंभीर समस्येच्या विळख्यात सापडला आहे. या रस्त्यामुळे करजुवे गावाचे नैसर्गिक सौंदर्य तसेच प्रसिद्ध फुणगुस दर्गा प्रकाशझोतात आला असून, गणपतीपुळे येथे जाण्यासाठी अनेक पर्यटक या मार्गाचा वापर करत आहेत. खाडी समांतर रस्त्यामुळे येथील स्थानिक व्यवसाय व मासेमारी उद्योगालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. मात्र करजुवे परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे आधीच रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यातच सध्या या मार्गावर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात सुरू असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम व माती टाकण्यात आल्याने हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः रात्रीच्या वेळेस येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे पर्यटकांसह येथील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टाइम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने लक्ष घालावे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा खाडीपात्र परिसरातील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg