loader
Breaking News
Breaking News
Foto

​वेंगुर्ले शिवसेना तालुका निरीक्षकपदी विद्याधर परब यांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - नगरपालिका निवडणुकीनंतर रंगलेल्या राजीनामा नाट्यामुळे चर्चेत आलेल्या वेंगुर्ले तालुका शिवसेनेची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मोठे पाऊल उचलले आहे. वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या निरीक्षक पदी जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब यांची नियुक्ती करण्यात आली असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिनाभरात नवीन कार्यकारिणीचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ​काही दिवसांपूर्वी वेंगुर्लेत तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या घडामोडींनंतर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ल्याची संपूर्ण शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. व प्रभारी तालुका प्रमुख नियुक्त केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या तालुक्यात अधिकृत पदाधिकारी नसल्याने संघटनात्मक कामात अडचणी येऊ नयेत, यासाठी निरीक्षक म्हणून विद्याधर परब यांची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.​ जोपर्यंत नवीन कार्यकारिणी जाहीर होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील सर्व संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार विद्याधर परब यांना देण्यात आले आहेत. नव्याने करावयाच्या कार्यकारिणीबाबत एका महिन्याच्या आत किंवा त्यापूर्वी पक्षाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने सक्षम फळी उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

टाईम्स स्पेशल

​"वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेची नवीन आणि मजबूत कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल. तोपर्यंत पक्षांतर्गत कोणताही पेच निर्माण होऊ नये यासाठी विद्याधर परब यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अहवालानंतर लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा होईल." असे संजू परब (शिवसेना जिल्हाप्रमुख) यांनी सांगितले. ​या नियुक्तीमुळे वेंगुर्ले शिवसेनेतील अंतर्गत मरगळ झटकली जाण्याची शक्यता असून, आता नवीन कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg