loader
Breaking News
Breaking News
Foto

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा आचरे जामडूल येथे कांदळवन अभ्यास दौरा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या उपक्रमशील प्रशालेने विद्यार्थ्यांना कांदळवृक्षाची शास्त्रीय माहिती व कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व समजण्यासाठी आचरे गावातील जामडूल या छुप्या बेटाच्या खाडी परिसरात सुमारे सहाशे एकर परिसरात पसरलेल्या कांदळवन परिक्षेत्राचा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये जामडूल बेटावरील रहिवासी आणि कोकण स्पर्शचे संचालक ओमप्रकाश आचरेकर व एकनाथ आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन वृक्षाची सविस्तर माहिती सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कांदळवनातील पक्षी व प्राणी जीवन, जलीय परिसंस्था, मत्स्य प्रजननात कांदळवनाची भूमिका, हवा प्रदूषण व जमिनीची धूप रोखण्यामध्ये कांदळवनाचे महत्त्व, कांदळवनाच्या विविध प्रजाती, राज्य कांदळवन वृक्ष, कांदळवनाचे औषधी उपयोग, कांदळवनाच्या नवीन रोपांच्या निर्मितीची प्रक्रिया, कांदळवन संरक्षण कायदा इत्यादी विषयी आचरेकर यांनी सविस्तर व महत्त्वपूर्ण माहिती दिल्याने विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणामुळे भूगोल व विज्ञान विषयाचे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे पूरक ज्ञान मिळण्यास मदत झाली. जामडूल खाडी परिसरातील कांदळवनाचे सौंदर्य पाहून सर्व विद्यार्थी भारावून गेले.

टाइम्स स्पेशल

या कांदळवन दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना ओमप्रकाश आचरेकर यांनी स्वतः केलेल्या खेकडे पालन व्यवसायाबद्दलही माहिती दिली. खेकड्यांच्या विविध प्रजाती, खेकडे पालनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, खेकड्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य इत्यादी बाबत खेकडे पालनाची व्यावसायिक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनात व्यावसायिक दृष्टिकोन जागृत केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, ज्येष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर, प्रयोगशाळा परिचर पी. व्ही. खोडके सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg