loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळये येथे जंगली हत्ती कळपाकडून शेती बागायतीची प्रचंड नासधूस, लाखोंचे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक राज्यातून दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाचा गेली २४ वर्षे दोडामार्ग तालुक्यात वावर असताना वन विभाग राज्य सरकार जंगली हत्ती कळपासाठी आवश्यक खाद्य लागवड करू शकले नाही किंवा उपलब्ध करून देवू शकले नाही. त्यामुळे याचा फटका स्थानिक शेतकरी लोकांना सोसावा लागत आहे. पाळये येथे जंगली हत्ती कळपाने गणपत महादेव दळवी यांच्या शेती बागायतीमध्ये शिरकाव करून नारळ, सुपारी, केळी, झाडांचे मिळून लाखो रुपये नुकसान केले आहे. वन विभाग राज्य सरकार यांच्या ढिसाळ कारभारामुळे हत्ती उपद्रव वाढू लागला असा आरोप गणपत दळवी यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी खोऱ्यातील अनेक शेतकरी आज मुंबई सोडून गावात येऊन शेती बागायती करू लागले आहेत. पण हत्ती संकट शेतकरी बांधवांना जगू देत नाही. जंगली हत्ती कळपासाठी तिलारी खोऱ्यातील धरण परिसरात राखीव मोकळ्या जागेत किंवा जंगलात हत्ती कळपासाठी आवश्यक खाद्य निर्माण करण्यासाठी वन विभाग यांनी पावले उचलली असती तर आज शेतकरी देशोधडीला लागला नसता. २४ वर्षात वन विभाग खाद्य निर्माण करू शकले नाही पण हत्ती उपाययोजना नावाखाली हजारो कोटी चुराडा केला पण हत्ती कर्नाटक राज्यात गेले नाही किंवा बंदिस्त केले नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg