loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व, विजयी उमेदवारांची बाजारपेठेतून भव्य मिरवणूक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असुन नगराध्यक्षपदाच्या अंत्यत चुरशीच्या झालेल्या लढतीत महायुतीचा उमेदवार विजयी झाला. आमदार किरण सामंत किंग मेकर ठरले असुन लांजा नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेची सत्ता येताच शिवसेना कार्यकर्त्यांतून एच जल्लोष साजरा झाला. विजयी उमेदवारांची लांजा बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लांजा नगरपंचायत निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते, सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. आमदार किरण सामंत यांनी या निवडणुकीकडे जातिनिशी लक्ष केंद्रित केले होते. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले होते. आमदार किरण सामंत यांनी या आधी नगराध्यक्षसह शिवसेनेचीच सत्ता येणार, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखेर आज झालेल्या निकाला दिवशी महायुतीची सत्ता येताच कार्यकर्त्यांतून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आमदार किरण सामंत यांचा फोटो झळकवत कार्यकर्ते नाचत होते. या मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीत अपूर्वा सामंत, सुनिल कुरुप, गुरुप्रसाद देसाई, प्रसन्न शेट्ये, मुन्ना खामकर, लल्या कुरूप, युवराज कुरूप संजय तेंडुलकर, आदीसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg