loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेवरून धावणार पंजाब-गोवा विशेष रेल्वेगाडी; नाताळ, नववर्षानिमित्त अमृतसर ते मडगाव रेल्वे

काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असून अनेकांना गोव्यात नाताळ आणि नववर्ष स्वागत सोहळे साजरा करण्याचे वेध लागले आहेत. विविध राज्यातील पर्यटकांना गोव्यात आणि कोकणात येण्यासाठी, विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. आता पंजाब ते गोवा विशेष रेल्वेगाडी कोकण मार्गावरून धावणार आहे. अमृतसर ते मडगाव रेल्वेगाडीमुळे शेकडो प्रवासी, पर्यटकांना दिलासा मिळेल. नाताळ, नवीन वर्षानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी उत्तर रेल्वेच्या समन्वयाने गाडी क्रमांक ०४६९४ / ०४६९३ अमृतसर – मडगाव – अमृतसर आरक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. नवीन वर्षानिमित्त धार्मिकस्थळी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे पंजाब येथील सुवर्ण मंदिराला भेट देऊ इच्छिणाऱ्या कोकण आणि मुंबई परिसरातील नागरिकांना या गाडीचा उपयोग होणार आहे. राज्यातील कोकण रेल्वे मार्गावरील १२ रेल्वे स्थानकात या रेल्वेगाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करणेही सोयीस्कर होईल. पनवेल ते सिंधुदुर्ग असा प्रवास प्रवाशांना करता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०४६९४ अमृतसर – मडगाव आरक्षित विशेष एक्सप्रेस २७ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी अमृतसर येथून पहाटे ५.१० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी मडगावला दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०४६९३ मडगाव – अमृतसर आरक्षित विशेष एक्स्प्रेस मडगाव येथून २४ डिसेंबर, २९ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता अमृतसरला पोहोचेल.

टाईम्स स्पेशल

या रेल्वेगाडीला बियास, जालंधर सिटी, लुधियाना, अंबाला कँट, पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा, गंगापुर सिटी, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाल, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकवर थांबा घेईल. या रेल्वेगाडीला एकूण २१ लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे असतील. यात तृतीय श्रेणीचे वातानुकूलितचे दोन डबे, तृतीय श्रेणीचे वातानुकूलित इकॉनॉमी दोन डबे, शयनयानचे आठ डबे, सामान्य सात डबे, जनरेटर कार दोन डबे अशी संरचना असेल. या रेल्वेगाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, प्रवासी आरक्षण प्रणाली वरून प्रवाशांना करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg