loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग येथे स्कुटरची एस. टी. बसला धडक, एक जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग केळीचेटेंब येथे मांगेली येथे जाणाऱ्या स्कुटर चालकाने वळणावर दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात बाबरवाडी दोडामार्ग एस.टी.बसला धडक दिली. एस.टी. बस चालकाने त्याला वाचवण्यासाठी एस.टी. बस एकदम कडेला गटारात घेतली. तरी स्कुटर मागच्या चाकाखाली धडकली. या अपघातात स्कुटर चालक संदीप गवस, रा. मांगेली तळेवाडी हा जखमी झाला. त्याचा पाय मोडला. त्याला दोडामार्ग रूग्णालयात दाखल करण्यासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर खाजगी रुग्णवाहिका बोलावून जखमीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय नंतर गोवा येथे हलविण्यात आले. त्याच्या मागे बसलेली युवती सुखरूप होती. अपघात ठिकाणी पोलीस दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग येथून स्कुटर चालक, युवती मांगेली येथे जाण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान एक स्कुटर याला ओव्हरटेक करताना दोडामार्ग केळीचेटेंब येथे वळणावर ओव्हरटेक करताना समोर बाबरवाडी एस टी बसला धडकला. बस चालकाने एस टी बस बाहेर मारली नाहीतर दोघे बस खाली सापडले असते. बस चालक देवदूत बनला फक्त पायावर निभावले. अपघात झाल्यानंतर जखमी रूग्ण याला दाखल करण्यासाठी १०८डायल केली असता ती गोवा मेडिकल कॉलेज मध्ये गेली त्यामुळे जखमी रूग्ण जवळपास वीस पंचवीस मिनिटे जाग्यावर तळमळत होता नंतर दोडामार्ग येथील खाजगी रुग्णवाहिका बोलावून घेतली बाबुराव धुरी इतरांनी जखमीला रुग्णवाहिका मध्ये घातले. त्याचा उजवा पाय मोडला आहे. शिवाय गंभीर जखम झाली आहे. तर सोबत असलेली युवती सुखरूप होती.

टाइम्स स्पेशल

या अपघात मुळे वाहतूक कोंडी झाली. दोडामार्ग पोलीस ठाण्यात अपघात माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एस टी बस चालकाने अपघाताची माहिती सावंतवाडी डेपोत दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहने उशिरा दोडामार्ग पोलीस ठाण्यात नेली. स्कुटर चालकाच्या चूकिचा बस चालकाला फटका बसला बस चालक याची या अपघातात काही चूक नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg