loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निवडणुकीतील जय-पराजयापलीकडे जाऊन माणुसकी आणि मैत्रीचे दर्शन काल सावंतवाडीत पाहायला मिळाले. सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची त्यांच्या 'गुरुकुल' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राजकारणापेक्षा मैत्री महत्त्वाची असल्याचे मानत जिरगे यांनी साळगावकर यांचे सांत्वन केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बबन साळगावकर यांचा अत्यंत निसटता पराभव झाला. या निकालाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"यावेळी साळगावकर निवडून यायला हवे होते," अशा भावना अनेक शहरवासियांनी व्यक्त केल्या. निकालानंतर शेकडो नागरिक साळगावकर यांच्या भेटीला येत आहेत. विशेषतः नगरपरिषदेचे सफाई कामगार आणि कर्मचारी यांनी साळगावकर यांची भेट घेऊन "आम्ही तुमची वाट पाहत होतो," असे म्हणताच साळगावकर भावूक झाले होते. ​मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी काल मंगळवारी सायंकाळी साळगावकर यांची भेट घेतली.

टाईम्स स्पेशल

यावेळी त्यांनी साळगावकर यांना धीर दिला. जिरगे म्हणाले की, "पराभवाने खचून न जाता यापुढेही अधिक जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय राहा. तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि अनुभवी नेतृत्वाची या शहराला खूप गरज आहे." ​या अनपेक्षित पण माणुसकीने भरलेल्या भेटीबद्दल बबन साळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी नगरपरिषद आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर व बंड्या तोरस्कर उपस्थित होते. सत्ता असो वा नसो, जनतेच्या आणि प्रशासनाच्या मनात साळगावकर यांनी कमावलेले स्थान या भेटीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg