loader
Breaking News
Breaking News
Foto

इटली देशात दूषणकारी रसायनाचे उत्पादन करणारी एक कंपनी लोटे एमआयडीसीत येणार का .? कॉंगेसचे निवेदन :जनतेत साशंकता |

मुंबई : इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल होत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे . त्यामुळे कोंकणातील जनतेला या मागचे सत्य नेमके काय .? हे कळू शकलेले नाही . साहजिकच जनतेत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इटली या देशात प्रदूषणकारी रसायनाचे उत्पादन करणारी एक कंपनी खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये होऊ घातली आहे, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे मुख्यमंत्री यांचे नावे एक निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा आणि संपूर्ण कोकण हे बहुतांशी प्रदूषण मुक्त विभाग असल्याने इटलीमध्ये 2019 मध्ये लोटे एम आय डी सी मध्ये सुरू होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व रायगड जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याला बाधित असून याच कंपनीमधून इटलीमध्ये प्रदूषण झाल्याचे म्हटले आहे त्यामुळे इटली देशात अंदाजे तीन लाख 50 लोक बाधित झाले. या कंपनीचे लोटे एमआयडीसी उत्पादन झाल्यास लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर कंपनीत बंदी आणावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली आहे. दरम्यान याबाबत जनतेच्या माहितीसाठी उद्योग विभाग प्रशासनातर्फे खुलासा करण्यात आला तर जनतेला वस्तुस्थिती समजेल व सामान्य जनतेची साशंकता दूर होईल , असे स्थानिक पातळीवर म्हटले जात आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कॉंग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg