loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे 19 महाराष्ट्र बटालियन (BN) एनसीसी कराड यांच्या वतीने विशेष कॅम्पचे आयोजन

दापोली (वार्ताहर) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे दिनांक 19 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत 19 महाराष्ट्र बटालियन (BN) एनसीसी कराड यांच्या वतीने विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात ३०० हून अधिक एनसीसी कॅडेटनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. यामध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास व राष्ट्रप्रेमाची भावना विकसित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. तसेच शिबिरादरम्यान कॅडेटस्ना ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार, फिल्ड क्राफ्ट याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन, भारतीय सैन्यात प्रवेशाची माहिती आणि व्यक्तिमत्त्व विकास व आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कॅडेटस्मध्ये संघभावना व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात आली. तसेच या प्रशिक्षणादरम्यान ट्रॅकिंग सुधा आयोजित करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कॅम्पमध्ये एनसीसी कॅडेट्सना एनडीआरएफ मार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ २० डिसेंबर २०२५ रोजी देविदास ताम्हाणे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा) व अजय विजया सूर्यवंशी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रत्नागिरी) यांच्या हस्ते झाला. या प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक आपत्तींच्या वेळी करावयाची बचाव कार्ये, प्राथमिक उपचार, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, तसेच स्वयंसेवी भावनेचा विकासावर भर देण्यात येणार आहे. अनुभवी एनडीआरएफ प्रशिक्षकांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन करण्यात येणार असून कॅडेट्सना वास्तविक परिस्थितीची तयारी करून दिली जाणार आहे. या शिबिरात कॅडेट चा रंगारंग कार्यक्रम सुधा घेण्यात येणार आहे. त्या मध्ये कॅडेट च्या सर्व गुणांना वाव मिळणार आहे.

टाइम्स स्पेशल

शिबिराचे आयोजन १९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बबेर, प्रशासकीय अधिकारी कर्नल पद्मानाभन व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ.एच.व्ही.बोराटे तसेच बटालियनचे सर्व अनायुक्त अधिकारी आणि ज्युनियर कमिशन प्राप्त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले. तसेच हे वार्षिक प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ संजय भावे यांचं पाठबळ लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg