loader
Breaking News
Breaking News
Foto

आता सुईची टोचणी नको, डायबिटीजचे रुग्णांसाठी आता Afrezza

भारतात १० कोटीहून जास्त लोक डायबिटीज म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आहेत. ज्यात १० लाख लोक टाईप – १ डायबिटीचे शिकार आहेत. ज्यांना सर्वात जास्त इन्सुलिनची गरज पडते. टाईप – १ डायबिटीजने पीडीत लोकांसाह टाईप – २ डायबिटीजच्या लोकांनाही इन्सुलिनची गरज असते. डायबिटीजचे रुग्ण देशात जास्त आहेत. हा चिंतेचा विषय आहे. टाईप १ डायबिटीज पीडीत लोकांना इन्सुलिनची सर्वात जास्त गरज असते.इन्सुलिनचा वापर डायबिटीज रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी केला जातो. Cipla या प्रख्यात औषध कंपनीने इन्हेल्ड इन्सुलिन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंजेक्शन टोचण्याच्या वेदनेतून सुटका होणार असून श्वासातून ते आता घेता येणार आहे.Cipla ही औषध निर्मिती कंपनी भारतात डायबिटीज रुग्णांसाठी नवीन उपचार प्रणाली आणत आहे. आतापर्यंत इन्सुलिनची गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शन द्वारे ते दिले जात होते. परंतू आता या कंपनीने त्यात बदल करुन ‘अफ्रेजा’ (Afrezza) नावाची रॅपिड एक्टींग इन्हेल्ड इन्सुलिन पावडरीला भारतीय मार्केटमध्ये उतरवण्याची घोषणा केली आहे. इंजेक्शनच्या सुईतून इन्सुलिन घेण्याची कटकट संपणार आहे. डायबिटीजचे रुग्ण आता इन्सुलिन पावडल इन्हेल करुन श्वासातून आपल्या शरीरात हे औषध शोषू शकणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कंपनीने माहिती देताना सांगितले की त्यांना रॅपिड एक्टींग इन्हेल्ड इन्सुलिन पावडरीला मंजूरी मिळालेली आहे. सरकारी औषध संस्था Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) कडून ही मंजूरी कंपनीला मिळालेली आहे.लवकरच नव्या प्रकारच्या इन्सुलिनला भारताच्या बाजारपेठेत उतरवले जाणार आहे. त्यांना या औषधांची जाहिरात करण्याची परवानगी देखील मिळाली आहे. कंपनीच्या मते हे पावडर इन्सुलिन डायबिटीज रुग्णांसाठी अधिक परिणाम कारक आहे.

टाइम्स स्पेशल

Afrezza नावाच्या रॅपिड एक्टींग इन्हेल्ड इन्सुलिन पावडर एक खास सिंगल उपयोग कार्ट्रीजमधून एका छोट्या इन्हेलरच्यामाध्यमातून वापरता येणार आहे. डॉक्टरने सांगितलेल्या प्रमाणानुसार आपला डोस इन्हेलरला लावून थेट श्वासाद्वारे हे औषध शरीरात जाऊ शकते. Cipla चे ग्लोबल चीफ डायरेक्टरच्या मते या नव्या इन्सुलिनद्वारे लोकांना रोज आता इंजेक्शनच्या सुईची वेदना सहन करण्याची काही गरज राहणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg