loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीतील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य: ना.नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी)- भाजप म्हणून अतिशय चांगली लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली. माझ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने काम केले. सावंतवाडी वेंगुर्लेत दोन्ही नगराध्यक्ष चांगल्या फरकाने निवडून आले आहेत. कणकवलीत समीर नलावडे आणि मालवणमध्ये शिल्पा खोत यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनीही या निवडणूकीत चांगली लढत दिलेली आहे. कणकवलीतील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी व्यक्त केली. आम. निलेश राणे यांचेही मी अभिनंदन करतो मालवण, कणकवली त्यांच्या नेतृत्वात जिंकली आहे. असे ना.नितेश राणे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले, भाजपचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्रध्दाराजे भोसले आणि वेंगुर्लेत राजन गिरप निवडून आलेले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवणमध्ये ममता वराडकर, कणकवलीत संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत. पालकमंत्री म्हणून नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. शहर विकासासाठी कुठलाही पक्षपाती न करता 100 टक्के न्याय देण्याची हमी देतो. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन, मालवण, कणकवली त्यांच्या नेतृत्वात जिंकली आहे. कणकवलीकरांनी शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी व संदेश पारकर यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला साथ दिली आहे. कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

भाजपचे कार्यकर्ते मालवण आणि कणकवली या दोन शहरामध्ये अतिशय प्रामाणिक लढले. लोकशाहीमध्ये लोकमताचा आदर ठेवायचा असतो. कणकवली आणि मालवणमध्ये संघटनात्मक लढण्यासाठी निश्चित पावले उचलू. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन करतो. कणकवलीत शहर विकास आघाडीचे आणि मालवणमध्ये या निवडणूकीचे नेतृत्व निलेश राणे यांनी केलं. त्यांचे अभिनंदन करतो. शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिले, त्याबद्दल मी सहकार्य करण्यासाठी तयार असेन. कारण जनतेने त्यांच्या शब्दावर विश्वास टाकून निकाल दिला आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. विकासकामांसाठी असलेला निधी हा जनतेचा असतो, राजकारणापलिकडे जावून काम करायचे आहे. विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या माध्यमातून चारही ठिकाणी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg