loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर धंगेकरांनी मनातली खदखद बोलून दाखवली; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पुण्यात हालचालींना वेग

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजप शिवसेना शिंदे यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. शिवसेनेकडून जितक्या जागांची मागणी केली जात आहे, तितक्या सर्वच्या सर्व जागा सोडण्यास भाजपने अद्यापपर्यंत तयारी दर्शवली नाही. यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पुण्यासाठी सुरू असलेली जागावाटपातील रस्सीखेच थांबवून तोडगा काढणे गरजेचे आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेना शिंदे पक्षाचे रवींद्र धंगेकर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मागणी काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुण्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा बळकवल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापले होते. अखेर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला. पण आता आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून धंगेकरांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. या कोंडीमुळे रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धंगेकरांनी जागावाटवापरून निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा आरोप केला असून, नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमधील अंर्तगत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

टाईम्स स्पेशल

शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपही निवडून आलं नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg