loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगाव येथे आयशर टेम्पो संरक्षण कठड्यावर आदळला;चालक किरकोळ जखमी

नांदगाव प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला. सुदैवाने चालक आत अडकून ही किरकोळ जखमी होत बालंबाल बचावला आहे. सदर अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जात असताना नांदगाव दत्तमंदिर समोरील संरक्षण कठड्यावर घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठडाला आढळल्याने दर्शनी भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला असून आयशर टेम्पो चालक महेंद्र राजाराम वारिक (वय 38, रा. पडेल वारिकवाडी ता. देवगड ) हा आतमध्ये अडकला होता. स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये , संभाजी पाटील, अनिकेत बिडये ,गुरु साळुंखे यांच्या मदतीने तसेच या ठिकाणीहुन प्रवास करणारे एस.टी.चालक व वाहक यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. व नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी त्याला प्रथम उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले.सुदैवाने चालक बालंबाल बचावला आहे यामुळे या ठिकाणी काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना कळवताच अपघातस्थळी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे तसेच ट्रॅफिक पोलीस श्री जगताब, घाडी दाखल झाले. जेसिबीच्या मदतीने आयशर टेम्पो बाजुला घेऊन पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg