loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्मयोगी शिक्षण संस्था संचालित छत्रपती राजश्री शाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालय टेटवलीत निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न

खेड - जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा रुखी पोस्ट असोंड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे कर्मयोगी शिक्षण संस्था संचालित छत्रपती राजश्री शाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालय टेटवली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी श्रमसंस्कार निवासी शिबिर संपन्न झाल. जिल्हा रत्नागिरी शिबिरामध्ये सिद्धयोग महाविद्यालय खेड चे प्राध्यापक एडवोकेट दिलीप चव्हाण आणि विराज चिखले त्यांनी बीए बीकॉम, बीएससी च्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स त्याचप्रमाणे आपले जीवन घडवताना पाहण्यात येणारी मोठी स्वप्ने सत्यात कशी उतरवावी आणि कमी वेळेत नीटनेटका अभ्यास कसा करावा आणि वकिली क्षेत्रातील विविध संधी त्याचप्रमाणे विधी शाखेत प्रवेश कसा मिळतो, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, त्याचा लाभ तेथील विद्यार्थ्यांनी घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिद्ध योग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या दायित्व या उपक्रमांतर्गत प्रा. ऍड.दिलीप चव्हाण हे काम पाहतात. कॉलेजचे प्राचार्य शिंदे यांनी प्रा. ऍड.चव्हाण आणि चिखले यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या शंका प्रा. ऍड. दिलीप चव्हाण यांना विचारल्या, त्याचं निरसन त्यांनी समर्थकपणे केलं. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं त्यांचा प्रसन्न चेहरा सांगत होता. काहीही अडचण आल्यास आमच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाला भेट द्या किंवा आमच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या फोनवरती फोन करा. आम्ही तुमच्या शंका चे निवारण करू अशी ग्वाही चिखले यांनी विद्यार्थ्यांना दिली. सिद्धयोग विधी कॉलेजचे हा उपक्रम विध्यार्थ्यांना फार मोलाचा आहे, असे प्राचार्य शिंदे यांनी उपस्थिताना सांगितले. सरते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg