loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये 'जीवन संगीत' कार्यक्रम उत्साहात

खेड - ( प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये जीवन संगीत फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संतोष बोराडे यांचा 'जीवन संगीत' एक विशेष संगीत-प्रेरक कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी जीवन संगीत फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संतोष बोराडे तसेच नरेंद्र भोईर यांचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी शाल, श्रीफळ, रोपटे व पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तद्नंतर डॉ. संतोष बोराडे यांनी आपल्या जगण्याचे संगीत समजावताना विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. संगीताचा आधार घेऊन विद्यार्थी व पालकांना त्यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या जगण्यात एक सुमधुर संगीत लपलेले असते. जगण्याचे संगीत समजावून घेताना आपल्या आचार विचारांचा ताळमेळ बसणे महत्त्वाचे असते. लोक काय म्हणतील ? याचा विचार करून आपण आपल्याला अनेक मर्यादा घालत असतो. त्यामुळे काही बाबतीत आपला विकास खुंटतो. प्रत्येकाने आपल्यातील चांगल्या गुणांचा वापर व्यक्तिमत्व विकासासाठी केला पाहिजे. अहंकार नावाचा वायरस माणसांमध्ये असता कामा नये. ज्याला लहान होता येते, तो आयुष्यात सहज मोठा होतो. माणसाने कृती करत असताना बुद्धीला ताब्यात ठेवणे गरजेचे असते. यश प्राप्त करायचे असेल तर यशाची गुरुकिल्ली ही आयुष्याच्या संगीतानेच साध्य होते. शेवटी आयुष्य खूप अनमोल आहे, ते संगीताप्रमाणे सुमधुर बनवले पाहिजे असे सांगून, त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान त्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना सामावून घेतले. सर्वांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि असे म्हणावयास हरकत नाही की, कार्यक्रम संपताना प्रत्येकजण आयुष्य जगण्याचा खरा मंत्र घेऊन गेला. प्रत्येकाला सूर गवसल्यासारखे वाटत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते डॉ. संतोष बोराडे यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती करंबेळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg