loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध गोवा बनावटी दारू जप्त

बांदा (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करत गोवा बनावटी विदेशी दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणण्यात आली आहे. गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर हॉटेल विवा क्लासिकसमोर, सटमटवाडी-बांदा येथे ही कारवाई करण्यात आली. 23 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पांढऱ्या रंगाचा चारचाकी मालवाहू टेम्पो वाहन थांबविण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील भागात बनवलेल्या गुप्त कप्प्यामध्ये तसेच सिमेंटच्या विटांखाली लपवून ठेवलेली गोवा बनावटी विदेशी मद्याची 36 बॉक्स साठवणूक आढळून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत अंदाजे 3 लाख 68 हजार 600 रुपये किमतीची दारू व 8 लाख किमतीचे वाहन असा एकूण 11 लाख 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालक प्रवीण महादेव बोळे (वय 30, रा. बेरावडी, ता. माढा, जि. सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिखलकर व अधीक्षक कीर्ती शोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, रणजित शिंदे तसेच जवान दीपक वायचळे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री व सतीश चौगुले यांनी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग, तपासणी नाका इन्सुली येथील अधिकारी करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg