loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा म्हणून सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी स्वीकारला पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचा दिला शब्द

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या विजयानंतर, आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. अत्यंत उत्साही आणि भव्य अशा या सोहळ्यात फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक आणि २० नगरसेवकांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​या पदग्रहण सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे युवराज लखमराजे भोसले यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, या सोहळ्याला राजकीय मतभेद विसरून विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजप व मित्रपक्ष: संजू परब (माजी नगराध्यक्ष) यांच्यासह सातही नगरसेवक, ​काँग्रेस: नगरसेवक तौकीर शेख, ​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): नगरसेवक देवेंद्र टेमकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना सौ. श्रद्धाराजे भोसले भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, "आमच्या पूर्वजांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. तोच वारसा पुढे नेत, आता आम्ही शहराचा सर्वांगीण विकास आणि जनसेवेला प्राधान्य देऊ. तब्बल ३५ वर्षांनंतर माझ्या रूपाने राजघराण्याला जनतेची सेवा करण्याची ही संधी भारतीय जनता पक्ष आणि सावंतवाडीच्या जनतेने दिली आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे." ​सोहळ्याच्या सुरुवातीला नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडीच्या नूतन नगरसेवकांचेही जंगी स्वागत करण्यात आले. शहरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून, नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg