loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवणार : श्रद्धा सावंत - भोंसले

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपालिकेत झालेला आमचा विजय हा विजय सर्व सावंतवाडीकरांचा विजय आहे. ज्या सावंतवाडीकरांना शहराचा विकास अपेक्षित आहे त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या होत्या या सर्व समस्या दूर करून सावंतवाडी शहराला सुंदर व विकसित शहर बनविण्याचे आमचे स्वप्न आहे व आमचे निश्चितच पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांचे आशीर्वाद व पालकमंत्री नितेश राणे व माझ्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सावंतवाडीकरांना अपेक्षित असा विकास निश्चितच करून दाखवू, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोंसले यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडीकर नागरिकांचे मनोमन आभार मानले. त्या म्हणाल्या, सावंतवाडीतील नागरिकांनी राजघराण्याला नेहमीच आपलं प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. राजघराणेने देखील सावंतवाडीच्या जनतेसाठी नेहमीच भरभरून दिले आहे. राजघराण्याचा हा लोकसेवेचा वारसा यापुढेही सुरू ठेवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपले आई-वडील तसेच राजघराण्यातील जेष्ठ मंडळींचे आशीर्वाद व त्यांनी दिलेला पाठिंबा यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

टाइम्स स्पेशल

सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव ही सावंतवाडीची शान असून तो अधिक सुंदर व आकर्षक बनविण्यासाठी काम करू. त्याचबरोबर जनतेला आवश्यक असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी तसेच येथील आरोग्य सुविधा अधिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करणार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg